आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:स्वच्छता अभियानांतर्गत कचरीकुंडी मुक्तीचा प्रयत्न

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेतर्फे शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात येते आहे. या अभियानांतर्गत कचराकुंडी मुक्त शहर उपक्रम राबवला जातो आहे. त्यानुसार शहरातील काही रस्त्यांवरील कचराकुंड्या हटवण्यात आल्या आहे. स्वच्छता अभियानांतर्गत महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत आहे. नागरिकांना ओला व सुका कचरा वर्गीकरण करून घंटागाडीत देण्याचे आवाहन करण्यात येते आहे.

तसेच शहर कचराकुंडीमुक्त करण्याचा प्रयत्न होतो आहे. शहरातील विविध भागात कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहे. आता तहसील कार्यालयासमोरील कचराकुंडीसह मौलवीगंज भाग व जुन्या महापालिकेच्या लगत रस्त्याच्या कडेला असलेली कचराकुंडी महापालिकेने हटवली आहे. याठिकाणी कचराकुंडीत मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जाता होता. अनेकदा कचराकुंडी भरून वाहायची. या ठिकाणी असलेली कचराकुंडी हटवण्यात येऊन तेथे महापालिकेचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...