आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त फे चला जाणू या नदीला अभियान राबवले जाते आहे. या अभियानात जिल्ह्यातून एकमेव भात नदीचा समावेश झाला आहे. पण या नदीची लांबी कमी असल्याने अभियानात नव्याने पांझरा नदीचा समावेश करण्यासाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केली.
चला जाणू या नदीला या अभियानांतर्गत जिल्हास्तरीय समितीची जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले की, अभियानात पांझरा नदीच्या समावेशासाठी पाठपुरावा करावा.
पांझरा नदीच्या काठावरील मोठ्या गावांची यादी तयार करावी. चला जाणू या नदीला अभियानात शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी संवाद यात्रा काढावी, असेही ते म्हणाले. अभियानाचे समन्वयक दिलीप पाटील, सहायक समन्वयक उमेश पाटील, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकात पवार, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.