आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगावात भीषण अपघात:यावल-बऱ्हाणपूर राज्यमहामार्गावर पपयांचा ट्रक पलटला, रावेर तालुक्यातील 15 मजूर जागीच ठार

जळगाव21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
या अपघातात महिला आणि मुलांचाही मृत्यू झाला आहे - Divya Marathi
या अपघातात महिला आणि मुलांचाही मृत्यू झाला आहे
  • रविवारी मध्यरात्री साडे 12 ते 1 दरम्यान घडली घटना

यावल अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्यमार्गावर किनगावजवळ आयशरच्या अपघातात 15 मजूर ठार झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 15 मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले आहेत. रविवारी मध्यरात्री साडे 12 ते 1 वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

प्राथमिक माहितीनुसार पपया भरलेला आयशर चोपडाकडून यावलकडे येत होता. दरम्यान यावल अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्यमार्गावर किनगाव जवळ एका वळणावर ट्रकचा रॉड तुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. अपघाताची माहिती मिळताच जळगाव आणि यावल येथील पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पलटी झालेला ट्रक क्रेनच्या साहाय्याने सरळ करण्यात आला. त्यानंतर मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर दोन जखमींवर सध्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मयताचे नावे

1) शेख हुसेन शेख मुस्लिम मन्यार वय 30 रा फकीर वाडा रावेर

2)सरफराज कासम तडवी वय 32 रा के-हाळा

3) नरेंद्र वामन वाघ वय 25 रा आभोडा

4) डिंगबर माधव सपकाळे वय 55 रा रावेर

5) दिलदार हुसेन तडवी वय 20 आभोडा

6) संदीप युवराज भालेराव वय 25 रा विवरा

7) अशोक जगन वाघ वय 40 रा आभोडा

8) दुर्गाबाई संदीप भालेराव वय 20 रा आभोडा

9) गणेश रमेश मोरे वय 05 वर्ष रा आभोडा

10) शारदा रमेश मोरे वय 15 वर्ष रा आभोडा

11) सागर अशोक वाघ वय 03 वर्ष रा आभोडा

12) संगीता अशोक वाघ वय 35 रा आभोडा

13) सुमनबाई शालीक इंगळे वय 45 रा आभोडा

14) कमलाबाई रमेश मोरे वय 45 रा आभोडा

15) सबनुर हुसेन तडवी वय 53 रा आभोडा

बातम्या आणखी आहेत...