आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दोन वर्षांनंतर भरणार एकवीरादेवीची यात्रा; पाळणे चालक दाखल, मंदिर प्रशासनातर्फे तयारी, 15 एप्रिलपासून यात्रा

धुळे5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खान्देश कुलस्वामिनी एकवीरादेवीच्या यात्रेला १५ एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. कोरोनामुळे दोन वर्षापासून यात्रा झाली नव्हती. कोरोनाला रोखण्यासाठी लावण्यात आलेले सर्व निर्बंध हटवण्यात आल्याने आता मंदिर प्रशासनातर्फे यात्रेची तयारी वेगात सुरू केली आहे. नदी पात्रात पाळणे चालक दाखल झाले आहे.

काेरोनामुळे दोन वर्षापासून चैत्र महिन्यात भरणारी एकवीरादेवीची यात्रा भरली नव्हती. आता शासनाने सर्व निर्बंध हटवले आहे. त्यामुळे १५ एप्रिलपासून यात्रा भरणार आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी अर्थात चर्तुदशीला मंदीर परीसरात मानता, नवस फेडणाऱ्याची मोठी गर्दी होईल. त्यानंतर १६ एप्रिलला एकविरा देवीची पालखी व रथयात्रा काढण्यात येणार आहे. रथयात्रा जुन्या धुळ्यातील चौदाव्या गल्लीतून निघेल. ती बडगुजर गल्ली, कुभांर खुंट, सुभाष पुतळा, गल्ली नंबर सहा, आनंदीबाई जावडेकर हायस्कूल, खोलगल्ली, सन्मान लॉज, आग्रा रोडने सरळ महात्मा गांधी पुतळामार्गे मंदिरात येणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी आतापासून नियोजन सुरू

कोरोनाचा संसर्ग आता कमी झाला आहे. यंदा दोन वर्षांनंतर देवीची यात्रा भरेल. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यात्रेसाठी मंदिराकडून सर्व नियोजन करण्यात येते आहे. दर्शन सुलभ होण्यासाठी काळजी घेण्यात येईल. यात्रोत्सवात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होतील. सोमनाथ गुरव, एकवीरादेवी मंदिर ट्रस्ट एकवीरादेवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात दाखल झालेले पाळणे.

खासगी सुरक्षारक्षकांसह सीसीटीव्ही कॅमेरे लावणार
यात्रेच्या काळात देवीचे दर्शन करण्यासाठी राज्यासह परराज्यातून भाविक येतात. यंदा गर्दी होण्याची शक्यता असल्याने मंदिर प्रशासनातर्फे तयारी सुरू करण्यात आली आहे. मंदिराच्या बाहेर मंडप टाकण्यात येणार असून पाण्याची सोय केली जाणार आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. खासगी सुरक्षा रक्षक नेमले जाणार आहे. यात्रेनिमित्त पांझरानदीच्या पात्रात विविध व्यवसायिक दुकान थाटतात. त्यांनीही आता तयारी सुरू केली आहे. काही पाळणे चालक मंदीर परिसरात दाखल झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...