आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:मालपूर सोसायटीची निवडणूक बिनविरोध, संचालकांचा गौरव; 13 संचालकांचा सत्कार

साक्री13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मालपूर विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक भाजपचे प्रांतिक सदस्य सुरेश रामराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली. सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी बिनविरोध निवड झालेल्या १३ संचालकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी नवनिर्वाचित संचालक व मालपूरचे माजी सरपंच सचिन सोनवणे, प्रवीण रावसाहेब भामरे, पंडित शंकर सोनवणे, अशोक श्यामराव भामरे, जयप्रकाश श्यामराव भामरे, रमेश धर्मा काकुस्ते, गुलाबराव देवराव सोनवणे, रणजित अशोक भामरे, प्रवीण शंकर बोरसे, रामराव जयमल बच्छाव, शिवदास राजाराम धनगर, चित्राबाई गोकूळराव भामरे, कल्पनाबाई किशोर खैरनार यांचा सत्कार करण्यात आला. मालपूरच्या उपसरपंच भारतीताई भीमराव भामरे, ग्रामपंचायतीचे गटनेते तथा माजी सरपंच नयनेश भामरे, ज्येष्ठ ग्रामस्थ रमाकांत खैरनार, गोकूळराव भामरे, अशोक सोनवणे, उत्तमराव सोनवणे, भाईदास खैरनार, श्रावण खैरनार, अशोक भामरे, माजी उपसरपंच वैभव सोनवणे, शिलवंत काकुस्ते, योगेश भामरे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...