आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:नवे पालकमंत्री मिळाल्यावर नियोजन समितीची निवडणूक

धुळे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा नियोजन समितीचे कामकाज, अडीच वर्षांपासून सदस्यांची निवड झाली नसल्याने त्यांच्याशिवाय सुरू होते. न्यायालयाने एप्रिल महिन्यात आठ आठवड्यांत निवडणूक घेण्याचे आदेश दिले. प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली. दुसरीकडे राज्यात सत्तांतर झाले. आता पालकमंत्री मिळाल्यावरच निवडणूक होईल.

नियोजन समितीवर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सदस्यातून प्रतिनिधींची निवड हाेते. सदस्य निवड झाली नसल्याने जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर राज्यात सत्तापालट झाल्याने पुढील हालाचाली थांबल्या. जिल्ह्याला नवीन पालकमंत्री मिळालेले नाही. त्यामुळे निवडणुका घेऊन फायदा होणार नसल्यामुळे स्थिती जैसे थे असल्याचे चित्र आहे.

बातम्या आणखी आहेत...