आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:शिरपूरला प्राथमिक शिक्षक समिती पदाधिकाऱ्यांची निवड

शिरपूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूर तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे त्रैवार्षिक अधिवेशन किसान विद्या प्रसारक संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात झाले. या वेळी कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यानुसार तालुकाध्यक्षपदी शालिग्राम सैंदाणे यांची निवड झाली.

समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील अध्यक्षस्थानी होते. या वेळी निशांत रंधे, राज्य प्रतिनिधी सुरेश पाटील, जिल्हा सरचिटणीस बापू पारधी, एकनाथ भामरे, आनंदराव पाटील, अनिल सोनवणे, गोपाल लोहार, संदीप पाटील, गोकुळ सोनार, कैलास ईशी, ज्ञानेश्वर धनगर, जितेंद्र राजपूत, शरद भामरे, भीमराव माळी आदी उपस्थित हाेते. अधिवेशनात समितीच्या सरचिटणीसपदी भूपेंद्र राजपूत, कार्याध्यक्षपदी सूरसि॑ंग पावरा, कोषाध्यक्षपदी वीरेंद्र पवार, उपाध्यक्षपदी सुनील आढवे, मनिलाल पावरा, मुख्य संघटकपदी भास्कर कुमावत, कालूसि॑ंग पावरा यांची निवड करण्यात आली. निशांत रंधे यांनी मनोगत व्यक्त केले. राजेंद्र पाटील यांनी संघटनेच्या माध्यमातून एकस्तर वेतनश्रेणी, वरिष्ठ व निवड श्रेणी, पदोन्नती मुख्याध्यापक, घरभाडे भत्ता आदी प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले.

बातम्या आणखी आहेत...