आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:प्रियदर्शिनी सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूर येथील प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. आमदार अमरीश पटेल, आमदार काशिराम पावरा, सूतगिरणीचे चेअरमन भूपेश पटेल यांच्या नेतृत्वाखाली २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी सर्व १७ संचालक बिनविरोध निवडून आले.

कापूस उत्पादक शेतकरी मतदार संघातून भूपेशभाई पटेल (शिरपूर), जनार्दन पाटील (भाटपुरा), संग्रामसिंग राजपूत (अहिल्यापूर), नामदेव चौधरी गुजर (वाडी बु.), रमेश कोळी (होळनांथे), जगतसिंग राजपूत (जातोडा), भरत पाटील (बलकुवा), आशिष चौधरी (शिरपूर), संदीप देवरे (वरवाडे), अजितकुमार शाह, वासुदेव पटले (पाटील) (मांजरोद), बिगर कापूस उत्पादक मतदार संघातून गोपाल भंडारी (शिरपूर) यांची, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून सत्तारसिंग पावरा, महिला प्रवर्गातून रंजना गुजर, मेघा राजेंद्र पाटील, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून प्रभाकर चव्हाण (शिरपूर), भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्गातून सुदाम भलकार यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी यांनी संचालकांच्या निवडीची घोषणा केली.

बातम्या आणखी आहेत...