आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सवाचे नियोजन:दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी युवराज नगराळे यांची निवड

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तरमुखी मारुती मित्र मंडळ व विजय व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच रमेश बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीत दहीहंडी उत्सव समिती अध्यक्षपदी युवराज नगराळे यांची निवड केली.बैठकीत संस्थापक राजेंद्र बोरसे यांनी उत्सवाचे नियोजन कसे करावयाचे याबद्दल मार्गदर्शन केले. भावराज बोरसे यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून देवपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, अॅड. साहेबराव भामरे, डॉ. मनीष जाखेेटे, रावसाहेब वाघमारे, रवींद्र आघाव, अरुण बोरसे, गौरव जगताप, राकेश अहिरे, सुमीत भावसार, दीपक जैन, पांडुरंग चौधरी, राजेंद्र चौधरी, विकास अहिरे आदी उपस्थित राहणार आहे.

दहीहंडी उत्सव समिती कार्यकारिणी अशी : अध्यक्ष युवराज नगराळे, उपाध्यक्ष प्रदीप सूर्यवंशी, कार्याध्यक्ष योगेश चित्ते, प्रसिद्धिप्रमुख बबलू चौधरी यांची निवड करण्यात आली. तर सदस्यपदी प्रदीप बोरसे, कैलास चौधरी, दाजमल गायकवाड, अरुण चौधरी, राजेंद्र चौधरी, गणेश अग्रवाल, पंकज खरे, कैलास खोंडे, गणेश फुलपगारे, किशोर गायकवाड, दीपक बिरारी, तुषार बोरसे, राजू बर्वे, फकिरा चौधरी, गौरव बोरसे, गणेश बर्वे, विशाल कुहाडे, शरद बिरारी, फकिरा चौधरी, यश कांजरेकर, सचिन कोळी, मोहित चौधरी, यश बोरसे.

बातम्या आणखी आहेत...