आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशाेत्सव:गणेश मंडळांसह विविध सेवाभावी संस्था, संघटनांकडून समाजाेपयाेगी उपक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर

अक्कलकुवाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जय श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने खापर येथे २०१ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
अक्कलकुवा
तालुक्यातील खापर येथे जय श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सवाचे आैचित्य साधून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक अन्साराम आगरकर, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख तुकाराम वळवी, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुधीरकुमार ब्राम्हणे, इरा इंटरनॅशनल स्कूलचे योगेश सोनार, प्राचार्य नीलेश पाटील, केंद्रप्रमुख सयाजी पाडवी, मुख्याध्यापिका आशा पटेल, अनामिका ठाकरे, शिवसेनेचे मनोज चौधरी आदी उपस्थित होते.

यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने स्थापना केलेल्या गणपती बाप्पाचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. सामाजिक उपक्रम म्हणून मागील काेराेनाचा काळ लक्षात घेऊन शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणात तसेच पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लागावा म्हणून २०१ विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष योगेश चौधरी, संस्थापक सचिव जगदीश खोंडे, संस्थापक उपाध्यक्ष वैभव सूर्यवंशी, केतन वाडिले, सल्लागार योगेश पवार, खजिनदार मुकेश मराठे, तुषार मराठे आदी उपस्थित होते. यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष मनोहर येशी, उपाध्यक्ष आकाश मराठे, सचिव महेश पवार, सहसचिव लखन कोळी, पवन सूर्यवंशी, मयूर वाडिले, रोहित चौधरी, उमेश प्रजापती, प्रकाश कापुरे, विजयानंद कापुरे, प्रकाश पवार, पिंटू मानवर, गणेश मराठे, भूषण सूर्यवंशी, हर्षल चौधरी, तिमा पाडवी, अनुराग पवार, मनीष बागुल, संकेत अग्रवाल आदींनी परिश्रम घेतले.

तळोद्यात भोईराज गणेश मंडळाकडून पर्यावरणपूरक पिशव्या हाेताय वाटप
तळोदा

येथील भोईराज नवयुवक गणेश मंडळाच्या वतीने पर्यावरणपूरक पिशव्यांचे वाटप नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या हस्ते नागरिकांना करण्यात आले. भोईगल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात गणेश मंडळाच्या सुवर्ण महाेत्सवानिमित्त ‘कापडी पिशव्या वापरा, प्रदूषण टाळा’ असा संदेश देत गणेश मंडळाच्या वतीने शनिवारी मोठ्या प्रमाणात कापडी पिशव्यांचे वितरण केले.

या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेकांनी कापडी पिशव्या मागून घेतल्या तर काहींनी प्लास्टिकच्या पिशव्या सदस्यांच्या हाती सोपवत कापडी पिशव्यांचा आनंदाने स्वीकार केला. यावेळी नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्यासह उपस्थित उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, ज्येष्ठ नगरसेवक संजय माळी, शिवसेना शहरप्रमुख जितेंद्र दुबे, भाजप शहराध्यक्ष योगेश चौधरी, नगरसेवक सुभाष चौधरी, गौरव वाणी, रामानंद ठाकरे, माजी नगरसेवक अनिल माळी, प्रकाश ठाकरे, आनंद सोनार, कैलास चौधरी, कल्पेश चौधरी, भय्या चौधरी आदींच्या हस्ते या कापडी पिशव्यांचे वाटप झाले. मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. कार्यक्रम यशस्वितेसाठी भोई राज नवयुवक गणेश मंडळाचे अध्यक्ष अमोल वानखेडे, हिरालाल साठे, सचिव सचिन भोई, पवन मोरे यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले

बातम्या आणखी आहेत...