आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिका:गैरसमज दूर करण्यासाठी पोलिस मित्र संकल्पनेवर भर

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सततचा बंदोबस्त, चौकशी अन् कामात व्यग्र असलेल्या पोलिसांबद्दल असलेले गैरसमज दूर व्हावे, महिलांना पोलिसांची भूमिका समजावी या उद्देशाने गुरुवारी ७५० महिला व विद्यार्थिनींना दृश्यम दोन चित्रपट मोफत दाखवण्यात आला. महिला, विद्यार्थी व तरुणींच्या प्रश्नाबाबत पोलिस संवेदनशील व गंभीर आहे. पण अनेकवेेळा महिला तक्रारीसाठी पुढे येत नाही. त्यामुळे त्यांना त्रास देणाऱ्यांचे फावते.

पोलिसांविषयी असलेली भीती व गैरसमज त्याला कारणीभूत आहे. हा गैरसमज दूर व्हावा यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे. त्यानुसार गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता महिला व विद्यार्थिनींना मोफत दृश्यम चित्रपट दाखवण्यात आला. शाळा-महाविद्यालयांपासून चित्रपटगृहापर्यंत नेण्यासाठी पोलिसांनी वाहनांची व्यवस्था केली होती.

सहायक पोलिस अधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी यांनी मार्गदर्शन केले. महिला व पोलिसांमधील गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न होत आहे. महिलांनी पोलिसांची भूमिका समजून घ्यावी. तसेच काही तक्रार असल्यास अथवा काही गैर आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. पोलिस निश्चितच कारवाई करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. महिला, विद्यार्थिनी यांच्याशी संवाद वाढावा. त्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...