आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहनास उत्तम प्रतिसाद:पारंपरिक वाद्यांवर दिला भर;‎ मंडळांचा पाेलिसांतर्फे सन्मान‎

नंदुरबार‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील सार्वजनिक मंडळांनी पोलिस‎ दलाच्या आवाहनास उत्तम प्रतिसाद देत‎ पारंपरिक वाद्ये वाजवून जिल्हा डी.जे. व‎ डॉल्बी मुक्त केला. १९ फेब्रुवारी रोजी या‎ पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती‎ उत्सव साजरा करणारे वसंत पाटील, आष्टे,‎ गुणवंत पाटील, वावद, प्रकाश पाटील,‎ अध्यक्ष, नाशिंदे, राजेंद्र अग्रवाल, शहादा,‎ उत्तम पाटील, मोहिदा त.श., ता.शहादा,‎ दीपराज धनगर, म्हसावद, ता. शहादा यांचा‎ जिल्हा पोलिस दलाच्या वतीने प्रशस्तीपत्र व‎ पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.‎ नंदुरबार जिल्ह्यासाठी पोलिस विभागाने‎ सुरू केलेल्या डी.जे. व डॉल्बी मुक्त‎ अभियानास जिल्ह्यातील सर्व सामाजिक‎ संघटनांकडून वाढता प्रतिसाद मिळत अाहे.‎ जिल्हाभरात होणारे सर्व सण, उत्सव हे‎ डी.जे. व डॉल्बी साऊंड सिस्टिम न वाजवता‎ पारंपरिक वाद्यांचा वापर करून साजरे होत‎ आहेत.

जिल्हा पोलिस दलाने सुरू केलेल्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अभियानाचे हे मोठे यश मानले जात आहे. या‎ कार्यक्रमाच्या वेळी जिल्ह्याचे पोलिस‎ अधीक्षक पी.आर. पाटील, अपर पोलिस‎ अधीक्षक नीलेश तांबे, पोलिस उपअधीक्षक‎ विश्वास वळवी, विभागाचे उपविभागीय‎ पोलिस अधिकारी सचिन हिरे, अक्कलकुवा‎ विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी‎ संभाजी सावंत, अति.मुख्य कार्य अधिकारी‎ प्रमोदकुमार पवार, बाल कल्याण समितीच्या‎ अध्यक्षा नीता देसाई, आरोग्य अधिकारी‎ गोविंद चौधरी आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...