आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेला कंत्राटदारातर्फे चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी पुरवले जातात. कागदोपत्री काही कर्मचारी दर्शवले जातात. पण त्यांचा पीएफ जमा होत नाही. याविषयी माजी स्थायी समिती सभापती संजय जाधव यांनी शासनाकडे तक्रार केल्यावर महापालिका प्रशासनाकडे चौकशी करुन शासनाने अहवाल मागवला होता. याविषयीचा अहवाल प्रशासनाने शासनाकडे पाठवला.
ठेकेदारातर्फे कामाच्या आवश्यकतेप्रमाणे कर्मचारी घेऊन त्यांची नियुक्ती करण्यात येते. काही कर्मचारी कार्यालयीन कामासाठी व काही स्वच्छतेच्या कामासाठी घेण्यात येतात. काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती कागदोपत्री दाखवण्यात येऊन त्यांच्या नावे बिल मंजूर केली जातात. तसेच या कर्मचाऱ्यांचा पीएफ जमा होत नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले होते. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस यांनी चौकशी केली. याविषयीचा अहवाल त्यांनी आयुक्तांना दिला. त्यानंतर आता हा अहवाल शासनाकडे पाठवला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.