आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकच मिशन जुनी पेन्शन:कर्मचारी रस्त्यावर, अधिकारी बसून; काम ठप्प‎

धुळे‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू‎ करत अंशदायी पेन्शन योजना रद्द करावी या‎ मागणीसाठी शासकीय, निमशासकीय‎ कर्मचाऱ्यांसह शिक्षक, महाविद्यालयीन‎ कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संप सुरू‎ केला. संपात ५७ कर्मचारी संघटनेच्या‎ माध्यमातून जिल्ह्यातून ९ हजार ५०० कर्मचारी‎ सहभागी झाले. त्यामुळे जिल्हाधिकारी, जुने‎ प्रशासकीय संकुल, प्रांताधिकारी, तहसील,‎ जिल्हा परिषदेसह सर्वच शासकीय‎ कार्यालयांत शुकशुकाट होता. फक्त‎ अधिकारी दालनात बसून होते. दुसरीकडे‎ कर्मचाऱ्यांनी माेर्चा काढला.

संपामुळे‎ प्रशासकीय कामकाज ठप्प झाले.‎ शहरातील कल्याण भवनापासून सकाळी‎ अकरा वाजता सरकारी, निमसरकारी‎ कर्मचारी, शिक्षक संघटना समन्वय‎ समितीच्या नेतृत्वाखाली माेर्चा काढण्यात‎ आला. मोर्चात समितीचे निमंत्रक डाॅ. संजय‎ पाटील, अशाेक चाैधरी, सुरेश पाईकराव, सी.‎ यू. पाटील, सुधीर पाेतदार, राजेंद्र माळी,‎ दीपक पाटील, एस. यू. तायडे, वाल्मीक‎ चव्हाण, माेहन कापसे, कल्पेश माळी,‎ उज्ज्वल भामरे, संजय पवार, शुभांगी पाटील,‎ चंद्रशेखर पाटील, दिलीप पाटील, राजेंद्र नांद्रे,‎ व्ही. टी. गवळे, राजेंद्र पाटील, बापू पारधी,‎ वाय. एन. पाटील, देवानंद ठाकूर, गाेरख‎ पाटील, प्रतिभा घाेडके, किशाेर हरणे,‎ पल्लवी साबळे, ज्ञानेश्वर बाविस्कर, शशांत‎ रंधे, रमण गावित, प्रशांत पाटील, धनंजय‎ बाेरसे, संजय देवरे, संजय सैंदाणे, सुधीर‎ खैरनार, भूषण पाटील, प्रवीण राजपूत, गिरीष‎ पाटील, लक्ष्मण मराठे, एस. डी. मानकर,‎ अार. एस. पाटील,विसपुते आदी सहभागी‎ झाले. माेर्चात सहभागी कर्मचाऱ्यांनी विविध‎ घाेषणांचे फलक हातात घेतले हाेते. काहींनी‎ एकच मिशन, जुनी पेन्शन अशी घाेषणा‎ असलेल्या पट्या कपाळावर बांधल्या होत्या.‎ उमेश काेतकर यांनी पारंपरिक वेशभूषा करून‎ सर्वांचे लक्ष वेधले. हा मोर्चा भारतरत्न डाॅ.‎ बाबासाहेब अांबेडकर पुतळा, जे. बी. राेड,‎ अाग्रा राेड, पाराेळा राेड, मनपा मार्गे जेल‎ रोडवर आला. तेथे सभा झाली. संपात काही‎ राजकीय पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले.‎

काेणीही फिरकले नाही कार्यालयात‎
संपाची सर्वसामान्य नागरिकांना अांदोलनाची‎ कल्पना असल्याने मंगळवारी शासकीय‎ कार्यालयाकडे शहरातील नागरिक फिरकले नाही.‎ अपवाद वगळता काही जण ग्रामीण भागातून अाले‎ हाेेते. संपामुळे त्यांना परत जावे लागले.‎

कारवाईचा इशारा; उपयोग नाही‎
संपाला धुळे तालुका,शिंदखेडा ,शिरपूर,‎ साक्री तालुक्यातही प्रतिसाद मिळाला. काही‎ कर्मचाऱ्यांवर कामावर येण्याची सूचना ‎करत‎ कारवाई करण्याचा इशारा दिला पण‎ कर्मचारी संपात सहभागी झाले.‎

प्रशिक्षणार्थी परिचारिकांची मदत
‎संपात हिरे व जिल्हा रुग्णालयातील परिचारिका‎ सहभागी झाल्या. संपाचा रुग्णसेवेवर परिणाम‎ होऊ नये त्यासाठी प्रशिक्षणार्थी नर्सची मदत‎ घेण्यात आली. त्यामुळे रुग्णांची गैरसोय टळली,‎ असा दावा रुग्णालयाने केला आहे.‎

कंत्राटी कर्मचाऱ्यांवर भिस्त‎
जिल्हाधिकारी कार्यालयात‎ वनविभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना‎ नेमले होते. त्यांनी कार्यालय‎ उघडले.अधिकाऱ्यांचे स्वीय सचिव‎ म्हणून काम बघितले.कर्मचारी नसल्याने‎ अधिकारी दालनात बसून होते.‎ अधिकाऱ्यांनी प्रलंबित कामांचा निपटारा‎ केला. काही अधिकारी दुपारनंतर निवासी‎ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बसले‎ होते. अन्य कार्यालयातही कर्मचारी‎ नसल्याने कामकाज ठप्प झाले होते.‎

झेडपीत शांतता : जिल्हा परिषदेत सकाळपासून शांतता होती. दुपारी दोन वाजेनंतर काही कर्मचारी जिल्हा परिषदेच्या आवारात आले. पण त्यांनी‎ काम केले नाही. सकाळी अधिकारी दालनात बसून होते. दुपारनंतर तेही गायब झाले. संपामुळे मार्चअखेरच्या कामांना ब्रेक लागला. सकाळी अधिकारी व‎ पदाधिकाऱ्यांचे दालन उघडण्यास कोणीही नव्हते. दिवसभर पदाधिकारीही फिरकले नाही. काही विभागात कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...