आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपडपट्टीचे सर्वेक्षण:अतिक्रमण नियमानुकूल; जागेच्या मोजणीसाठी पत्र

धुळे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

झोपडपट्टीत राहणाऱ्यांचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार महापालिका हद्दीतील अतिक्रमित झोपडपट्टीचे सर्वेक्षण सुरू आहे. नकाणे रोडवरील दोन वसाहतींचे सर्वेक्षण झाले आहे. अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. तसेच जागेच्या मोजणीसाठी नगरभूमापन विभागाला महापालिकेने पत्र दिले आहे.

शहरातील अनेक भागात शासकीय व खासगी जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमित वसाहतीत मूलभूत सुविधा देणे त्रासदायक ठरते. त्यामुळे हे अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने खासगी एजन्सी नियुक्त करून शहरातील झोपडपट्टीचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले आहे.

नकाणे रोडवरील आंबेडकर नगर व साईबाबा नगराचे सर्वेक्षण झाले आहे. या भागातील जागेची मोजणी करण्यासाठी महापालिकेने नगरभूमापन विभागाला पत्र दिले आहे. तसेच देवपुरातील लाला सरदार नगरमधील अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. या भागातील नागरिकांचे अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

किती जणांचा आहे प्रस्ताव
नकाणे रोडवरील आंबेडकरनगर व साईबाबा नगरातील ३५५ जणांचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच लाला सरदार नगरातही ३२५ पैकी २०० अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र आहे.
हे कागदपत्र लागणार
ज्यांचे अतिक्रमण सन २०११ पूर्वीचे आहे त्यांचे अतिक्रमण नियमानुकूल होईल. त्यासाठी रहिवास पुरावा म्हणून रेशन कार्ड, वीजबिल, घरपट्टीची पावती द्यावी लागेल. शासनाच्या नियमानुसार १ हजार ५०० चौरस फूट जागा नियमानुकूल होईल.

बातम्या आणखी आहेत...