आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातळोदा हा सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला तालुका असून, शहर व परिसरात पन्नास ते शंभर वर्षे असणारी किंबहुना त्याहून अधिक वय असणारे अनेक डेरेदार व जीर्ण वृक्ष आहेत. यातील काही सुकलेले आहेत तर काहींचे खोड व फांद्यांना कीड लागून आतून पोकळ झालेले आहे. अशी झाडेही जोराची हवा आली तर लगेच कोसळतात किंवा त्यांच्या फांद्या तुटून खाली पडून एखाद्याचा जीवही जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा वृक्षांचे सर्वेक्षण करून ती काढून टाकत संभाव्य धोका टाळण्याची मागणी होत आहे.
तळोदा शहराबाहेरून नंदुरबारकडे जाण्यासाठी वापरात असलेल्या बायपास रस्त्यालगत असणाऱ्या एकलव्य पुतळ्याजवळ गेल्या २६ एप्रिल रोजी दुपारी सायकलवर खेळत असताना जीर्ण लिंबाचे झाड अंगावर कोसळल्याने नयन अविनाश माळी या १२ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. ही घटना ज्या रस्त्यावर झाली तो नेहमी वर्दळीचा रस्ता आहे. त्यामुळे रस्त्यावर मार्गक्रमण करणारे वाहनधारक देखील या वृक्षाखाली दाबले गेले असते. तर अशीच घटना ७ फेब्रुवारी २०१९ मध्ये दलेलपूर ते धवळीविहीर रस्त्यावर घडली होती.
धवळीविहीरकडे जाणाऱ्या दुचाकीस्वारांवर सुकलेल्या झाडाची फांदी कोसळून झालेल्या अपघातात राजेंद्र वनकर पावरा या दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाला होता तर दुसरा गंभीर जखमी झाला होता. त्यावेळीदेखील तळोदा शहर व परिसरातील जीर्ण तसेच सुकलेल्या झाडांचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला होता. मात्र तळोदा शहरातील जीर्ण झालेल्या झाडाने एका बालकाचा बळी घेतल्यानंतर पुन्हा एकदा सुकलेल्या व जीर्ण झालेल्या झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.