आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागा:अभियांत्रिकी 1 हजार 680 ; बीफार्मसीच्या 760 जागा

धुळे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संधीबारावीचा निकाल जाहिर झाल्या नंतर करीयरच्या दृष्टीने विद्यार्थी विविध विद्याशाखांना प्रवेश घेतात. यावर्षी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सर्वच प्रवेश परीक्षा या जुलै महिन्यापासून सुरू होणार आहेत. यामुळे व्यावसायीक अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना सध्या प्रतिक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, व्यावसायीक अभ्यासक्रमाकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षांची तयारीसाठी मोठा अवधी मिळणार आहे. जिल्ह्यात अभियांत्रिकीच्या ५ महाविद्यालयात १ हजार ६८० तर बीफार्मसीच्या ७ महाविद्यालयांमध्ये ७६० जागांची क्षमता आहे. बारावीनंतर व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी केंद्रीय प्रवेश परिक्षेनुसार प्रवेश मिळतो. कलाशिक्षणाची प्रवेश परीक्षा १२ जून रोजी होणार आहे.

विविध शाखांच्या २० हजार जागा
जिल्ह्यात व्यावसायिक अभ्यासक्रमासह नियमित, कला, वाणिज्य, विज्ञान, समाजकार्य, पत्रकारीता, शिक्षणशास्त्र सारख्या अभ्यासक्रमाचे उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाशी संलग्नीत ५३ महाविद्यालय आहेत. या महाविद्यालयात २० हजार जागांवर प्रथम वर्ष प्रवेशाची संधी विद्यार्थ्यांना आहे. त्यात सर्वाधिक जागा या कला शाखेच्या आहेत. त्या व्यतरिक्त विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या आहेत.

बीफार्मसीची महाविद्यालये अशी
बीफार्मसीच्या सात प्रमुख महाविद्यालय आहेत. त्यात आरसी पटेल फार्मसी शिरपूर, एचआर पटेल फार्मसी शिरपूर, गंगामाई फार्मसी नगाव, केव्हीपीएस फार्मसी बोराडी,अंहिसा फार्मसी दोंडाईचा, एसव्हीकेएम फार्मसी धुळे आणि निकम इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या महाविद्यालयांत ८०० जागांवर फार्मसीचे प्रवेश देण्यात येणार आहेत. फार्मसीची प्रवेश परीक्षा ही १२ ते २० ऑगस्टच्या दरम्यान होणार आहे.

सीईटीत गुणांकन वाढीची संधी
^जो पर्यंत सीईटी होत नाही तो पर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला सुरवात होणार नाही. सर्वच व्यावसायीक शिक्षणाच्या प्रवेश परीक्षा जुलै महिन्यापासून सुरू होतील. यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी तयारी करण्याची संधी आहे. ज्यांना बारावीत कमी गुण असतील अशा विद्यार्थ्यांना सीईटीत गुणांकन वाढवत प्रवेशाचाी संधी आहे.
-प्राचार्य डॉ.हितेंद्र पाटील, शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालय,धुळे

अशी आहेत अभियांत्रिकी महाविद्यालये : जिल्ह्यात अभियांत्रिकी शिक्षणासाठी शिवाजीराव देवर, गंगामाई, एसव्हीकेएम धुळे, आरसी पटेल अभियांत्रिकी शिरपूर व जयकुमार रावल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दोंडाईचा या महाविद्यालयांमध्ये १ हजार ६८० जागांवर प्रवेश होतो. अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठीची प्रवेश परीक्षा ही ५ ते ११ ऑगस्ट दरम्यान होणार आहे.

विधीसाठी २ ऑगस्ट रोजी प्रवेश परीक्षा
जिल्ह्यात विधीचे शिक्षण देणाऱ्या दोन महाविद्यालय आहेत. बारावी नंतरच्या पाच वर्ष विधी शाखेच्या प्रवेशासाठी २ ऑगस्ट रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे. त्यादृष्टीनेही विद्यार्थी तयारी करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...