आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा पोलिस दलातील रिक्त ४२ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. भरतीसाठी बीए, बीकॉमच नव्हे तर विविध २४ विद्या शाखांमधील उच्चशिक्षित तरुण व तरुणींनी अर्ज भरले आहे. त्यात १७ इंजिनिअर, एक डॉक्टर व १११ एमए, बीएड व डीएड उमदेवार आहे. एवढेच नव्हे तर एमबीए व बीएस्सीची पदवी घेणारे तब्बल ८७ उमेदवार पोलिस होण्यास इच्छुक आहे. जिल्हा पोलिस दलात तब्बल पाच वर्षांनंतर पोलिस भरती होते आहे. यंदाची भरती विविध कारणांमुळे वेगळी ठरली आहे. पोलिस दलाच्या ११६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच तृतीयपंथीयाने भरतीसाठी अर्ज भरला.
रिक्त ४२ जागांसाठी ३ हजार ९ पेक्षा अर्ज आले आहे. त्यातील १ हजार ८०१ उमेदवार प्राथमिक चाचणीत पात्र ठरले. यंदाच्या पोलिस भरतीसाठी केवळ बीए, बीकॉम पदवीधारकच नव्हे तर उच्चशिक्षित क्षेत्रातील उमेदवारांनी अर्ज भरून मैदानात येत चाचणीही दिली. त्यात सर्वाधिक ५४२ बीए पदवीधर उमेदवार आहे. तसेच विविध २४ विद्या शाखांचे विद्यार्थी आहे. त्यात १७ इंजिनिअर, ११० एमए व बीएड, १ डीएड असे एकूण १११ शिक्षक आहे. वकिलीचे शिक्षण घेणारे दोन उमेदवार आहे. बीए पदवीधारक ५४२ उमेदवार वर्षापासून तयारी करत होते. पोलिस भरतीवेळी उंची मोजताना कर्मचारी.
उच्च शिक्षितांमुळे आव्हान वाढले उच्च शिक्षण घेतांना शासकीय कोट्यातून प्रवेश मिळवला. शिवाय पदवी घेतली आहे. आता हेच तरुण पोलिस शिपाईसाठी स्पर्धेत उतरले आहे. त्यामुळे बीए व तत्सम उमेदवारांमधील चुरस वाढली आहे. दोन्हीकडे हात ठेवण्याचा हा प्रकार अयोग्य असल्याची प्रतिक्रीया खुद्द पोलिसांमधूनच उमटते आहे.
विद्या शाखानिहाय भरतीसाठी इच्छूक असलेले उमदेवार असे एमटेक ४, एमबीए ३, एम.एस्सी १६, बी.एसस्सी ८७, बीबीएम १, बीसीए ७, बीकॉम ६१, एमकॉम ५, बीएमएस १, एमएड १, एम फार्मसी १, एलएलबी २, बीएसडब्ल्यू २, एमएसडब्ल्यू ३, अॅग्रीकल्चर ७ व शाखांचे ५ उच्च शिक्षित उमदेवार भरतीसाठी उभे आहे.
उच्च शिक्षणाचा पोलिस दलाला फायदाच पोलिस भरतीसाठी उच्च शिक्षित उमेदवारांचे अर्ज आले आहे. प्राथमिक चाचणीत त्यातील अनेक उमेदवार पात्र ठरले आहे. उच्च शिक्षित उमेदवार पोलिस दलात आले तर त्यांच्या शिक्षण-कौशल्याचा फायदा होईल. किशोर काळे, अप्पर पोलिस अधीक्षक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.