आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे:खोरदड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शा‌ळापूर्व मेळावा उत्साहात

धुळे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

या कार्यक्रमाला पंचायत समितीचे सभापती विद्याधर पाटील, केंद्रप्रमुख सुरेश बैसाणे, सरपंच जगदीश पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश देवरे, अंगणवाडी सेविका, गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. इयत्ता पहिल्याच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. केंद्र प्रमुखांनी गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक हंसराज वाघ, युवराज पाटील, सरदारसिंग राजपूत, सोनाली पाटील, मनीषा नागरे यांनी विशेष सहकार्य केले.

सामोडे साने गुरुजी शाळा सामोडे येथील साने गुरुजी प्राथमिक विद्या मंदिरात पहिल्याच दिवशी मोफत पाठयपुस्तक वाटप करण्यात आले. पालकांचे व विद्यार्थ्यांचे वाजत-गाजत स्वागत करण्यात आले. तसेच नवगतांचे स्वागत औक्षण करण्यात आले. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हंसराज शिंदे, पालक वर्गातून प्रकाश घरटे, काशिनाथ जाधव, अरविंद घरटे, दिनेश भदाणे, देविदास भदाणे, महेश भदाणे, नरेंद्र गवळी, प्रशांत घरटे, शकुंतला शिंदे, अर्चना अहिरराव, सतिका देसाई, भागुबाई पिंपळे उपस्थित होता. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुलांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप केली.

पांडू बापू माळी विद्यालय येथील पांडू बापू माळी म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शाळा शुभारंभाच्या निमित्ताने नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे वाजत गाजत गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य के. पी. कुलकर्णी होते. उपमुख्याध्यापक कानडे, पर्यवेक्षक एम. एम. बैसाणे, कार्यालयीन अधिक्षक जे. बी. जाधव, ज्येष्ठ शिक्षक एस.एस. पावरा, प्रा. टी. पी. गुजर, प्रा. आर.एन. चौधरी, ए. एच. कोळी, एस. बी. पवार, एस. जी. वाडीले, जे. एन. महाजन, पी.आर. राजपूत आदी उपस्थित होते.पालकांच्या प्रातिनिधिक स्वरूपात दीपक वाडिले व नीलेश वाघ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...