आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्याेगमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी:स्टार्टअपसह नवीन उद्याेगासाठी जागा देत उद्योजकांना दिलासा दिला जावा; मनाेज माेरे

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्टार्टअपसह नवीन उद्याेग उभारण्यासाठी प्लाॅट उपलब्ध करून द्यावे, अवधान एमआयडीसीच्या विस्तारासाठी रावेर शिवारातील शासकीय जागा संपादीत करण्यात यावी, एमआयडीतील प्लाॅट धारकांना ४० टक्के बांधकामाची अट शिथिल करावी, अशी मागणी शिंदे गटाचे मनाेज माेरे व मनाेज वाल्हे यांनी केली आहे. याविषयी त्यांनी उद्याेगमंत्री उदय सामंत यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, सात राष्ट्रीय महामार्ग असलेला धुळे जिल्हा असूनही मागे आहे. दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीअल कॉरिडॉर मंजूर असूनही काम सुरू झालेले नाही. जिल्ह्यातील युवकांना रोजगार नसल्याने ते चुकीच्या मार्गावर जाता आहे. शहरात गुंडगिरी वाढली आहे. खून, दरोडे, चोरी, घरफोडी, मंगळसूत्र चोरी नित्याचे झाले आहे. दुसरीकडे शहरात काही युवा उद्योजक व स्टार्टअपसाठी उत्सुक आहे. पण एमआयडीसीत जागा शिल्लक नसल्याने नवीन उद्योगांना संधी मिळत नाही. त्यामुळे एमआयडीसीला लागून रावेर येथील शासकीय जागा ताब्यात घ्यावी. या ठिकाणी एमआयडीसीचा विस्तार करावा. त्यामुळे आपल्यास्तरावरून रावेर येथील जागा संपादनास तात्काळ मंजुरी देऊन उद्योग वाढीस चालना द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

एमआयडीसीत ४० टक्के बांधकामाची अट असल्याने उद्योग उभारणीसाठी जास्त खर्च येतो. त्यामुळे उद्योग अडचणीत येत आहे. त्यामुळे ही अटक शिथिल करावी, तसेच आवश्यक असेल तेवढेच बांधकाम करण्याची विशेष बाब म्हणुन परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या वेळी मंत्री उदय सामंत यांनी याविषयी सकारात्कक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मनोज मोरे यांना दिले.

बातम्या आणखी आहेत...