आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश‎:उद्योजकांना 30 दिवसांमध्ये‎ वीजबिलाचा परतावा द्यावा‎

धुळे‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरण कंपनीच्या शहर व ग्रामीण‎ विभागाकडे जमा असलेली वीजबिलाची‎ परताव्याची रक्कम उद्योजकांना व्याजासह‎ परत करण्याचे आदेश ग्राहक गाऱ्हाणे‎ निवारण मंचाने दिले. तसेच अधिकाऱ्यांवर‎ दंडात्मक कारवाई करण्याची सूचना केली.‎ शहरातील निर्मल ऑइल इंडस्ट्रीज आणि‎ एन. एस. मेटल्स कंपनीचा फेब्रुवारी २०१९‎ पासून महावितरण कंपनीकडे वीज बिलाचा‎ परतावा अडकला होता. ही रक्कम मिळावी‎ यासाठी उद्योजक वीज कंपनीच्या धुळे शहर‎ व ग्रामीण कार्यालयाकडे पाठपुरावा करत‎ होते. पण प्रतिसाद मिळाला नाही.

त्यामुळे‎ उद्योजकांनी नाशिक येथील ग्राहक गाऱ्हाणे‎ निवारण मंचाकडे धाव घेतली. ग्राहक‎‎‎‎‎‎‎‎‎‎ गाऱ्हाणे निवारण मंचामध्ये सुनावणी झाली.‎ मंचाने महावितरण कंपनीला परताव्याची‎ रक्कम ३० दिवसांच्या आत परत करण्यासह‎ जे अधिकारी रक्कम परत करण्यास दिरंगाई‎ करत होते. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई‎ करण्याचे आदेश दिले. तसेच अर्ज केेल्याच्या‎ तारखेपासून थकीत रकमेवरील व्याज‎ देण्याची सूचना केली.‎

बिलासाठी तगादा‎
वीज बिल थकीत असेल वीजपुरवठा‎ खंडित होतो. मात्र, वीजबिल परताव्याची‎ रक्कम २०१९ पासून मिळत नव्हती. त्यामुळे‎ ग्राहक गाऱ्हाणे मंचात धाव घेतली हाेती.‎ - भरत अग्रवाल, सचिव, खान्देश इंडस्ट्रीयल‎ डेव्हलपमेंट असोसिएशन‎

बातम्या आणखी आहेत...