आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेने काही संस्थांना सामाजिक कामांसाठी कराराने भूखंड दिले आहेत. त्यातील काही संस्थांसोबत केलेल्या कराराची मुदत संपली आहे. त्यानंतरही या संस्थांनी भूखंड महापालिकेच्या ताब्यात दिलेले नाही. आता अशा १५४ भूखंडांचे महापालिकेतर्फे मोजमाप होणार आहे. याविषयीची सूचना नगररचना विभागाला मनपा प्रशासनाने केली आहे.
शहरात महापालिकेच्या मालकीचे भूखंड आहे. त्यातील काही भूखंड सामाजिक संस्थांना कराराने नाममात्र शुल्कासह देण्यात आले आहे. पण कोणत्या संस्थेला किती वर्षांसाठी भूखंड दिले याची एकत्रित माहिती महापालिका प्रशासनाकडे नव्हती. काही संस्थांचे करार संपले आहे. पण या संस्थांनी अद्यापही भूखंड महापालिकेत जमा केलेले नाही.
याविषयाकडे नगरसेवकांनी लक्ष वेधले. तसेच करार संपलेले सर्व भूखंड ताब्यात घ्यावे, अशी सूचना केली. त्यानंतर महापालिकेने सर्व भूखंडांची माहिती घेण्यासाठी इस्टेट मॅनेजर नेमला. सर्व जागांचा व कागदपत्रांचा शोध घेण्यात आला. त्यानुसार शहरात १५४ भूखंड कराराने दिले असल्याचे निदर्शनास आले.
त्यातील बहुतांश भूखंडांच्या कराराची मुदत संपली आहे. त्यामुळे संबंधित सामाजिक संस्थांना भूखंड परत देण्यासाठी महापालिकेने पत्र व्यवहार केला आहे. पण अद्यापही या संस्थांनी भूखंड परत दिलेले नाही. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाने या भूखंडाचे मोजमाप करण्याचे ठरवले आहे. नगररचना विभागातर्फे हे काम होणार आहे. तसेच मोकळ्या जागांना महापालिकेचे नाव लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.