आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव‎:निसर्ग मित्र समितीतर्फे पर्यावरण ज्ञान,‎ रंगभरण स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा गौरव‎

धुळे‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील निसर्ग मित्र समितीतर्फे‎ राज्यस्तरीय पर्यावरण ज्ञान व चित्र‎ रंगभरण स्पर्धा झाली. या स्पर्धा‎ पारोळा रोड येथील कृषी नगर‎ माध्यमिक विद्यालयात झाल्या. यात‎ पर्यावरण ज्ञान स्पर्धेतील‎ विद्यार्थ्यांचा गुणगाैरव सोहळा‎ झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी‎ किशोर डियालानी होते. प्रमुख‎ अतिथी म्हणून समितीचे संस्थापक‎ प्रेमकुमार अहिरे उपस्थित होते. तर‎ प्रा. चंद्रशेखर विसपुते, शाहीर‎ विजय वाघ, राजेंद्र ढोडरे, निसर्ग‎ अहिरे आदींसह शिक्षक व विद्यार्थी‎ मोठ्या संख्येने उपस्थित होते.‎‎‎‎‎‎‎‎‎‎

निसर्ग मित्र समितीतर्फे राज्यस्तरीय‎ पर्यावरण ज्ञान स्पर्धा व चित्र‎ रंगभरण स्पर्धा राबवण्यात आली,‎ या स्पर्धेत राज्यातून सात विद्यार्थ्यांनी‎ सहभाग घेतला. त्यात कृषी नगर‎ विद्यालयाची विद्यार्थिनी भूमिका‎ नीलेश निकम हिने राज्यातून तृतीय‎ क्रमांक पटकावला. निसर्ग मित्र‎‎‎‎‎‎‎‎‎‎ समिती व विद्यालयातून सर्व‎ शिक्षकांनी तिचा सत्कार केला.‎ भूमिका निकम राज्यातून तृतीय‎ आल्याने तिचा गौरव करण्यात‎ आला. प्रास्ताविक मुख्याध्यापक पी.‎ के. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन‎ देवरे यांनी केले. आभार एस. एस.‎ पाटील यांनी मानले.‎

बातम्या आणखी आहेत...