आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळा:एकमेकांच्या सन्मानातूनच‎ स्त्री- पुरुष समानता : पवार‎

धुळे‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्त्री-पुरुष समानता म्हणजे महिला व पुरुष‎ दोघांनी एकमेकांचा सन्मान करत‎ एकमेकांचे मूल्य स्वीकारणे होय असे‎ प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या दर्शना‎ पवार यांनी केले.‎ सम्यक संघटना व महिला आर्थिक‎ विकास महामंडळातर्फे स्री-पुरुष समानता‎ याविषयावर तीन दिवसीय कार्यशाळा‎ झाली. त्या वेळी त्या बोलत होत्या. विजय‎ सोनवणे, प्रशांत मोरे, संदीप मराठे आदी‎ उपस्थित होते.

विषयतज्ज्ञ दर्शना पवार‎ म्हणाल्या की, स्री -पुरुष समानता म्हणजे‎ स्री-पुरुषांमध्ये तुलना करणे नाही तर‎ दोघांनी एकमेकांचा सन्मान करून‎ एकमेकांच्या श्रमाचे मूल्य स्वीकारणे होय.‎ मुळात समानतेवर बोलणे म्हणजे‎ स्त्रियांच्या बाजूने बोलणे असे नाही तर‎ न्यायाच्या बाजूने बोलणे असल्याचे त्या‎ म्हणाल्या. गीत, विविध खेळ, गटचर्चा‎ आदी उपक्रम राबवण्यात आले. या वेळी‎ कौटुंबिक हिंसाचार कायदा २००५ याविषयी‎ माहिती देण्यात आली. दिनेश पाटील,‎ गोरख पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.‎ कार्यशाळेत साक्री, शिरपूर, शिंदखेडा,‎ धुळे येथील प्रशिक्षण सहभागी झाले होते,‎ अशी माहिती देण्यात आली.‎

बातम्या आणखी आहेत...