आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:महिला महाविद्यालयात मुलींना‎ निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण‎

शहादा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎येथील सोनामाई महिला ‎महाविद्यालयात कवयत्री बहिणाबाई ‎चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ‎ अंतर्गत घेण्यात आलेल्या‎ जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेत ‎ ‎ यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना‎ बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य‎ डॉ. व्ही. एस. पाटील होते.‎ प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे ‎समन्वयक संजय राजपूत, परीक्षक ‎म्हसावद महाविद्यालयाचा प्रा.‎ संगीता पाटील, बामखेडा येथील‎ महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सी.‎ एस. करंके, शहादा तालुका‎ एज्युकेशन संस्थेचे प्रा. योगेश‎ पाटील उपस्थित होते.

प्रथम‎ मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचा‎ व सोनामाईंयांच्या प्रतिमेचे पूजन‎ करण्यात आले. नंतर निबंध स्पर्धेत‎ यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना‎ स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन‎ गौरवण्यात आले. त्यात प्रथम‎ क्रमांक रोहिणी योगेश सोनवणे,‎‎ शहादा तालुका एज्युकेशन संस्थेचे‎ विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय शहादा,‎ द्वितीय-विपुल निंबा पाटील‎ वसंतराव नाईक महाविद्यालय‎ शहादा, तृतीय-दिव्या नंदकिशोर‎ भावसार विज्ञान वरिष्ठ‎ महाविद्यालय शहादा, तर उत्तेजनार्थ‎ म्हणून निर्जला रामदास गुरव‎ सोनामाई महिला विद्यालय शहादा,‎ मुस्कान याकुब पठाण सोनामाई‎ महिला महाविद्यालय शहादा,‎ निजबा पिंजारी वसंतराव नाईक‎ ‎महाविद्यालय शहादा, प्राजक्ता‎ नितीन चिनावलकर लोणखेडा‎ महाविद्यालय व नर्गिस मन्यार‎ बामखेडा तालुका शहादा‎ महाविद्यालय यांच्या समावेश आहे.‎ या वेळी समन्वयक संजय राजपूत व‎ प्राचार्य डॉ. व्ही.एस.पाटील यांनी‎ मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व‎ सूत्रसंचालन विद्यार्थी विकास‎ अधिकारी प्रा. शोभा अहिरराव यांनी‎ केले.आभार प्रा. अशोक आहिरे‎ यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...