आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थापना:वैज्ञानिक, तर्कशुद्ध विचार सेलची स्थापना

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य प्राध्यापक प्रबोधिनी पुणे यांच्यातर्फे वैज्ञानिक आणि तर्कशुद्ध विचार सेल विद्यापीठात सुरु करण्यात आला आहे. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांच्याहस्ते या सेलचे उद्घाटन करण्यात आले. समन्वयक शिक्षणशास्त्र विभागप्रमुख प्रा. मनीषा इंदाणी यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली.

या कक्षाच्या माध्यमातून भविष्यात अनेक उपक्रम राबवले जाणार आहे. प्रा. आशुतोष पाटील, प्राचार्य मॅथ्यू अब्राहम, डॉ. कीर्ती देशमुख उपस्थित होते. याचा विद्यार्थ्यांना भविष्यात मोठा फायदा होणार आहे, असे विद्यापीठातर्फे कळवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...