आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाला जाग:पावसाळा संपला तरीही खड्डे तसेच, कधी येणार झोपलेल्या मनपाला जाग

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बारापत्थर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालवताना कसरत करावी लागते. खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होतात. त्यानंतरही महापालिका प्रशासनाचे खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष होते आहे.

शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. आता पाऊस थांबला असला तरी रस्ते दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही. गणेशोत्सवाच्या काळात महापालिकेने काही रस्त्यांवरील खड्डे मुरूम टाकून बुजवले होते. पण त्यानंतर झालेल्या जोरदार पावसामुळे पुन्हा स्थिती जैसे थे झाली. बारापत्थर रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते गुरुशिष्य स्मारकापर्यंत ठिकठिकाणी खड्डे आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहन मंदगतीने चालवावी लागतात. त्यातून या रस्त्यावर अनेकवेळा वाहतूक कोंडी होते. रस्त्यावर सर्वाधिक खड्डे पेट्रोल पंपासमोर व टॉवर गार्डन भागात आहे. पेट्रोल पंपासमोरील खड्डे काही दिवसांपूर्वी सिमेंट टाकून बुजवले होते. पण आता पुन्हा खड्डे पडले आहे. रस्त्यावर खडी विखुरली आहे. काँग्रेस भवनापासून टपाल कार्यालयापर्यंत खड्डे पडले आहे.

बातम्या आणखी आहेत...