आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाचे दु्र्लक्ष:पावसाळा तोंडावर आला तरी उपाययोजना नाही; अवधान एमआयडीसीत गटारी तुंबल्या, अतिक्रमणे वाढली

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अवधान एमआयडीसीतील समस्यांवर चर्चेसाठी गेल्या महिन्यात उद्योग मित्र समितीची जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. त्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने समस्या सोडवण्याचे आदेश दिले. हे आदेश देऊन एक महिना झाला तरी एमआयडीसीत अनेक समस्या जैसे थे आहे. पावसाळा तोंडावर आलेला असताना परिसरातील गटारी तुंबल्या आहे. काटेरी झुडप तोडलेली नाही. बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले आहे. मोकाट वराहांचा बंदोबस्त झालेला नाही. अनेक ठिकाणी अतिक्रमण आहे. त्यामुळे उद्योजकांची गैरसोय होत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठी औद्योगीक वसाहत अवधानला आहे. या ठिकाणी लहान, मोठे २ हजार ३५६ उद्योग असून या ठिकाणी भौतिकदृष्ट्या पोषक वातावरण असणे आवश्यक आहे. पण तशी स्थिती नाही. पावसाळा तोंडावर आला तरी अनेक समस्या कायम असल्याचे दिव्य मराठीने केलेल्या पाहणीत दिसून आले. एमआयडीसीत पक्क्या गटारी नाही. सांडपाण्यासह पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी चाऱ्या खोदल्या आहे. त्यात गाळ साचला आहे. पावसाळ्यापूर्वी गटारींमधील गाळ व कचरा काढला काही तर पावसाळ्यात गटारी तुंबतील. तसेच या भागात मोकळ्या जागेवर काटेरी झुडप वाढली आहे. या झुडपांच्या आडोशाला अनेकवेळा भुरटे चोर लपतात. त्यामुळे झुडप तोडण्याची गरज आहे. एमआयडीतील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहे.

पथदिव्यांची झाली दुरूस्ती
एमआयडीसीत गेल्यावर्षी अवकाळी पावासामुळे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर वीज कंपनीने पावसाळ्यापूर्वी पथदिवे व वीजवाहिन्या दुरूस्तीचे काम सुरू केले आहे. वीजवाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या वृक्षांच्या फांद्याची छटाई सुरू आहे. लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्यांना ताण दिला जातो.

वराहांमुळे उद्योजक हैराण
एमआयडीसी परिसरात वराहांची संख्या वाढली आहे. ते अचानक वाहनाच्या समोर येतात. त्यामुळे अपघात होतात. या पार्श्वभूमीवर मोकाट वराहांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी उद्योजकांच्या संघटनेने अनेकवेळा केली आहे.

सात वर्षापासून अतिक्रमणाचा प्रश्न
सात वर्षापासून अतिक्रमणाचा प्रश्न कायम आहे. अतिक्रमण निघावे यासाठी उद्योजकांची संघटना पाठपुरावा करते पण उपयोग होत नाही. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या काळात अतिक्रमणाची मोजणी करुन कारवाईचे आदेश झाले होते. त्यानतंर आलेले तात्कालीन जिल्हाधिकारी संजय यादव यांनीही पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते. आता महिन्यापूर्वी विद्यमान जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी अतिक्रमण काढण्याची सूचना केली. पण अतिक्रमण जैसे थे आहे.

अतिक्रमणाचा विळखा... एमआयडीसीत अतिक्रमण वाढले आहे. महिनाभरापूर्वी एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांनी अतिक्रमण निर्मुलनाच्या कामाचा ठेका देण्यासाठी निविदा काढण्यात येणार असल्याचे सांगितले होते. पण अद्यापही अतिक्रमण निर्मूलन झालेले नाही. एमआयडीसीत काही ठिकाणी अवैधरित्या मद्य विक्रीचे प्रमाण वाढले आहे.

अतिक्रमण निर्मलन निविदेला प्रतिसाद नाही
एमआयडीसीत वाढलेले गवत, काटेरी झुडपे काढण्याचे काम पुढील आठवड्यात सुरु होईल. आठ दिवसात सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी चाऱ्या खोदण्यात येतील. अतिक्रमण निर्मूलनासाठी निविदा प्रसिध्द केली होती. एकच निविदा प्राप्त झाली नाही. त्यामुळे आता पुन्हा निविदा प्रसिध्द होईल. किमान तीन निविदा धारकांनी निविदा भरल्या तर पुढील प्रक्रिया राबवली जाईल.
एम. एस. पाटील, कार्यकारी अभियंता, औद्योगीक वसाहत, धुळे

बातम्या आणखी आहेत...