आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत हा तरुणांचा देश आहे. देशातील तरुण सुदृढ राहिला तर देश बलवान होतो. याकरता प्रत्येक तरुणाने आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी नियमितपणे व्यायाम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. जिल्हा पोलिस दल, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद प्रशासन, महापालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने फिट धुळे, हिट धुळे ही थीम घेऊन शहरात मॅरेथॉन स्पर्धा झाली. उद्घाटन पोलिस कवायत मैदानावर पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते झेंडी दाखवून करण्यात आले.
या वेळी आमदार जयकुमार रावल, कुणाल पाटील, मंजुळा गावित, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी जलज शर्मा, उपमहापौर नागसेन बोरसे, पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, उपविभागीय पोलिस अधिकारी एस. ऋषिकेश रेड्डी, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजेते विजय चौधरी, महापालिकेच्या ब्रँड अँबेसेडर मृणाल गायकवाड उपस्थित होते. स्पर्धेत २१ किलोमीटर फुल मॅरेथॉन, १० किलोमीटर हाफ मॅरेथॉन, ५ किलोमीटर ड्रीम रन आणि ३ किलोमीटर फॅमिली रन चार विभागात आयोजन करण्यात आले होते.
पोलिस कवायत मैदानापासून सुरू झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेचा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, आग्रा रोड, पाच कंदील, कराची वाला खुंट, गांधी पुतळा, नेहरू चौक, दत्त मंदिर चौक, स्टेडियम तसेच मेहेरगावपासून पुन्हा पोलिस कवायत मैदान येथे समारोप झाला. स्पर्धेत धुळे जिल्ह्यासह जळगाव, नाशिक, नंदुरबार, नगर, अमरावती, मुंबई आदी जिल्ह्यातील स्पर्धकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.