आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन‎:काॅपीविरहित, तणावमुक्त‎ परीक्षेस प्रत्येकाने सामोरे जावे‎

धुळे‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावी आणि बारावी परीक्षा लवकर सुरू‎ होत आहेत. या पार्श्वभूमीवर माध्यमिक‎ आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे‎ अध्यक्ष नितीन उपासनी यांनी राजीव गांधी‎ माध्यमिक विद्यालय येथे भेट देत‎ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी‎ नितीन उपासनी यांनी इयत्ता १० वीच्या‎ विद्यार्थ्यांशी संवाद साधला.‎ या वेळी विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्याचे‎ तंत्र, परीक्षेला जाताना तणावमुक्त व कॉपी‎ विरहित सामोरे जा, तसेच काही‎ मार्गदर्शक सूचना केल्या.

पेपरला १०.३०‎ वाजता उपस्थित राहा. प्रश्नपत्रिका वाचा.‎ तसेच उत्तरपत्रिकेवरील सर्व सूचना‎ काळजीपूर्वक वाचा, बारकोड स्टिकर‎ तपासा, उत्तरपत्रिकेचे पेजेस तपासून घेणे,‎ प्रसन्न मनाने अभ्यास करा, या व परीक्षा‎ संदर्भात इतर सूचनांचे मार्गदर्शन केले. या‎ वेळी मुख्याध्यापक संजय पवार, सुनील‎ ठाकरे, जे. बी. सोनवणे, के. पी. पाटील,‎ एम. आर. पाटील, के. एन. पाटील, एस.‎ के. मोरे, शालिक बोरसे, एम. एस. सूळ,‎ एम.एस. पाटील आदी मोठ्या संख्येने‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...