आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादहावीच्या परीक्षांना गुरुवारपासून सुरुवात होत आहे. जिल्ह्यातील ६६ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होईल. पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर आपले नंबर पाहण्यासाठी गर्दी केली होती. कोरोनाच्या संकटातील तीन वर्षानंतर पहिल्यांदाच कडक नियमात ही परीक्षा होणार आहे. परीक्षा दरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी ११ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा कालावधीत येणाऱ्या अतिरिक्त मानसिक दडपणाच्या निराकरणासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. धुळे शहरात ३१, साक्री तालुक्यात १३, शिरपूर तालुक्यात ९, शिंदखेडा तालुक्यात १३ परीक्षा केंद्र आहेत. परीक्षा साहित्यासाठी ८ कस्टडी आहेत. त्यात धुळे शहरात ३, साक्री व शिंदखेडा तालुक्यात प्रत्येकी दोन तर शिरपूर तालुक्यात १ कस्टडी आहे. या परीक्षा मधील गैरप्रकार रोखण्यासाठी महसूल आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचे बैठे पथक आहे. या बैठे पथकाला बुधवारी जिल्हा नियोजन सभागृहात प्रशिक्षण देण्यात आले. परीक्षा केंद्राच्या ५० मीटर अंतरावर प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे.
अनधिकृत व्यक्ती बेकायदेशीररित्या प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना आढळून आला. तर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. परीक्षा कालावधीत परिक्षा केंद्राच्या परिसरात कलम १४४ लागू आहे. याच बरोबर परीक्षा केंद्राच्या बाहेरील झेरॉक्स दुकान बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, बारावीच्या परीक्षेच्या पहिल्या पेपरला पथकांनी करडी नजर ठेवली होती. त्यामुळे आताही दहावीच्या परीक्षेत पथकांची करडी नजर राहील, याचे नियोजन शिक्षण विभाग आणि प्रशासातर्फे करण्यात आहे. तर विद्यार्थी हे पहिल्यांदाच बोर्डाची परीक्षा देणार असल्याने त्यांना सोडण्यासाठी परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांसह पालिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच परीक्षा केंद्रांवर कोणाताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्ह्यातील सर्वच परीक्षा केंद्रांवर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेल्पलाइनची घ्या मदत
परीक्षांचा अतिरिक्त दडपण किंवा ताण तणाव विद्यार्थ्यांना आला तर तणाव निवारण्यासह परीक्षा कालावधीत येणाऱ्या अडचणीसाठी मंडळाकडून हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. ०२५३-२९५०४१०,२९४५२४१ ,२९४५२५१ या क्रमांकावर संपर्क करू शकतात. या व्यतरिक्त थेट राज्य मंडळाची हेल्पलाईन ०२०-२५७०५२७१,२५७०५२७ २ या क्रमांकावर संपर्क करू शकतात. ही हेल्पलाईन परीक्षा कालावधीत सुरु राहणार आहे.
अर्धा तास आधी केंद्रात हजर राहणे आवश्यक
प्रत्येक विद्यार्थ्यांनी पेपर सुरू होण्याच्या आधी अर्धा तास परीक्षा गृहात हजर राहणे बंधनकारक आहे. पेपरसाठी प्रश्नपत्रिका आणि उत्तर पत्रिका वितरीत झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणत्याच सबबीत परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येणार नाही. गुरुवारी मराठीचा तर ६ मार्च रोजी सोमवारी इंग्रजी विषयाचा पेपर होणार आहे.
प्रत्येक केंद्रावर बैठे पथकांचीही नियुक्ती
प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. बैठे पथकातील अधिकाऱ्यांनी परीक्षेचे गोपनिय पाकीट ताब्यात घेतल्या पासून ते केंद्रात पोहोचेपर्यंत व वितरीत करेपर्यंत चित्रीकरण करावयाचे आहे. तसेच संपूर्ण परिक्षा केंद्राचे देखील बैठे पथकाचे अधिकारी चित्रीकरण करणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.