आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षांना सुरवात:विद्यापीठाच्या 46 हजार विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध पदवी परीक्षांना गुरुवारी सुरवात झाली. बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बी.टेक. (कॉस्मेटिक सीएस), बी.फार्म., डी.पी.ए., बी.एम.एस. आदी सत्र परीक्षा २०२२साठी ४६ हजारपेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यावर्षी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका या परीक्षा केंद्रावर ऑनलाइन पद्धतीने पाठवल्या जाणार आहेत.

परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन ऑनस्क्रीन होणार आहे. प्रथम वर्षाच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन महाविद्यालयांत होणार आहे. पर्यावरण सामान्य ज्ञानाची परीक्षा ऑनलाइन होणार आहे. दरम्यान, कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना पत्र लिहिले असून या परीक्षा शांत व आत्मविश्वासाने देण्याचे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...