आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणवत्ता वाढीवर चर्चा:गुणवत्ता वाढीसाठी सहकार्याची अपेक्षा

बभळाज6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूर तालुक्यातील खर्दे येथील आर. सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पालक शिक्षक मेळावा झाला. मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी शिक्षकांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

प्राचार्य पी.आर. साळुंखे अध्यक्षस्थानी हाेते. या वेळी सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ पटेल, उपसरपंच नितीन चौधरी, पोलिस पाटील सुरेश सोनवणे, गोपाल चौधरी, सुजाता पाटील, मनीषा गुजर आदी उपस्थित हाेते. विद्यालयाचे शिक्षक अमोल सोनवणे यांनी शाळेतील विविध उपक्रमांची माहिती दिली. शिस्तीतून जीवन कसे घडते हे पटवून दिले. उच्च माध्यमिक विभागाच्या मनीषा पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनीही शिक्षकांना सहकार्य करावे, असे आवाहन केले.

पोलिस पाटील सुरेश सोनवणे यांनी शाळेची गुणवत्ता व भौतिक वातावरणातील बदल पाहून समाधान व्यक्त केले. प्राचार्य पी.आर साळुंखे यांनी गुणवत्ता विकासात पालकांची भूमिका याविषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी शाळेत आगामी काळात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. तसेच शाळेत वर्षभरात अध्ययन, अध्यापनाचे नियोजन कसे आहे याची माहिती देण्यात आली. मेळाव्याला उपस्थित असलेल्या पालकांनी त्यांच्या शंका मांडल्या. ए.जे. पाटील यांनी सूत्रसंचालन केलेे. बी.एस. बडगुजर यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...