आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अहोरात्र पहारा देणाऱ्या सैनिकांसह शहीद जवानांच्या कुटुंबाविषयी कृतज्ञता व्यक्त ; ​​​​​​​कापडणे येथे उपक्रम, सत्काराने सारेच भारावले

कापडणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील मंगलम गार्डनमध्ये लक्ष लोकहित संघर्ष पत्रकार संघातर्फे सैनिकांसह शहीद जवानांच्या परिवाराचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सत्काराने कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारावले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सोनीबाई भील होत्या. या वेळी दिलीप साळवे, नगरसेवक नागसेन बोरसे, शोभा चव्हाण, शोभा आखाडे, दिलीप मोहिते, श्रावण खैरनार, शंकर खरात, धुळे शहर वाहतूक शाखेचे धीरज महाजन, नगरसेवक नाशीर पठाण, भरत जाधव, विनोद केदार उपस्थित होते. या वेळी प्रा. घनश्याम थोरात यांच्या व्याख्यानासह भीमगीतांचा कार्यक्रम झाला. लक्ष लोकहित संघर्ष पत्रकार संघातर्फे गावातील सैनिक, शहीद जवानांच्या परिवारातील सदस्य, कोविड काळात योगदान देणारे डॉक्टर, नर्स, पोलिस, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी आदींचा सत्कार झाला. माजी सरपंच जया प्रमोद पाटील, उपसरपंच महेश माळी, प्रा. अंकिता पाटील, ग्रामपंचायत सदस्य हिंमत चौधरी, महेश पाटील, प्रवीण पाटील, नीलेश जैन, वैशाली माळी, उज्ज्वला माळी, वैशाली पाटील, हरीश पाटील, आशाबाई पाटील, आक्काबाई भील, जितेंद्र भील, कपील पाटील, स्वप्निल बोरसे, नाना भामरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी लक्ष लोकहित संघर्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष समाधान सुनील देवरे, प्रदेश महासचिव संतोष पारधी, उपाध्यक्ष रवींद्र भामरे, जिल्हाध्यक्ष आकाश बागुल, जिल्हा उपाध्यक्ष किरण ढिवरे, कैलास मोरे, बन्सीलाल मोरे, सिद्धार्थ बागुल, सुधेन भामरे, सचिन भामरे, विनोद भामरे, संतोष भामरे, सिद्धार्थ शिंदे, राकेश ब्राम्हणे, किरण देवरे, मयूर भामरे, गणेश भामरे, अनिकेत सौदाणे, नरेंद्र भामरे, अजय मोरे आदींनी प्रयत्न केले. हा उपक्रम सामाजिक बांधिलकीतून झाला.

बातम्या आणखी आहेत...