आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केबल लंपास:वाढत्या घटनांमुळे शेतकऱ्यांत संताप व्यक्त; बंदोबस्ताची केली मागणी

बोरदएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मोड आणि आष्टे शिवारातील दोन शेतांमधून चोरट्यांनी शेती पंपांची केबल वायर लंपास केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. चाेरीच्या या वाढत्या घटनांमुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शेतातील पिके वाचवण्यासाठी पाणी द्यावे लागते. त्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणाaत खर्च करावा लागतो.

त्यात वीज महावितरणच्या शेतीला वीजपुरवठा करण्याच्या वेळापत्रकानुसार मोड फीडरवरून सध्या रात्री उशिरा १२.२५ वाजता वीजपुरवठा याच वेळापत्रकानुसार आठवडाभर राहणार आहे. त्याची संधी साधून चोरट्यांनी मध्यरात्री दोन शेतकऱ्यांच्या शेतातील शेती पंपाची केबल वायर लंपास केली. या घटनांमुळे शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत. केबल वायरमध्ये तांबे धातू वापरलेला असल्याने ती जाळून माेड दिल्याने चोरट्यांना मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो. त्यामुळे चोरट्यांकडून केबल वायर चोरीचा गोरख धंदा राजरोस सुरू आहे. यासाठी पोलिस प्रशासनाने या घटनांमध्ये लक्ष घालण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्याला नव्या साहित्यासाठी सात हजारांचा भुर्दंड
केबल वायर चोरीच्या नियमित होणाऱ्या घटनांमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. वायर चोरीला गेल्यानंतर ट्यूबवेलमधून विजेचा पंप बाहेर काढावा लागतो. त्यामुळे मनुष्यबळासाठी लागणारा खर्च साधारण १००० ते १२०० रुपयांच्या तर केबल वायर नवीन आणली तर तो खर्च ६ हजारांपर्यंत जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना ७ हजारांचा आर्थिक भुर्दंड बसतो.