आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवीधरांची मतदार नाेंदणी सुरू:सिनेट निवडणूक नाव नाेंदणीसाठी मुदतवाढ

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चाैधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी पदवीधरांची मतदार नाेंदणी सुरू आहे. मतदार नोंदणीला एक महिना मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला आहे. आझाद समाज पार्टी व पदवीधर संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नाव नोंदणीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार ही मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती आझाद समाज पार्टीचे आनंद लाेंढे यांनी दिली.

सिनेट निवडणुकीसाठी ऑनलाइन नाव नाेंदणीची अंतिम मुदत १५ आॅगस्ट व अर्ज स्वीकृती केंद्रावर जमा करण्याची मुदत १९ आॅगस्टपर्यंत हाेती. पण पदवीधर उमेदवारांना इतक्या कमी वेळेत नावनाेंदणी करणे शक्य नसल्याने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती.

त्यानुसार आता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली असून, अर्जाची प्रत १९ सप्टेंबरपर्यंत जमा करता येणार आहे. ऑनलाइन नाव नाेंदणीसाठी पदवीधरांनी फाेटाे, पदवी सर्टिफिकेट, मार्कशीटसह आधारकार्ड, लाइटबिल, मतदान कार्ड यापैकी एका झेराॅक्स प्रतीसह पंकज ऑनलाइन शहा काॅम्प्लेक्स, आयकर भवनसमाेर साक्रीराेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन पदवीधर संघर्ष समिती व आझाद समाज पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष आनंद लाेंढे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...