आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:ऊस तोड झाल्या शिवाय कारखाने बंद करू नये

धुळे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांमध्ये सध्या गाळप सुरू आहे. साखर कारखाने बंद होणार असून तत्पूर्वी ऊस तोडणी शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांनी स्वत: ऊस तोड करून व वाहतूक करुन आपला ऊस कारखाने बंद होण्यापूर्वी स्वखर्चाने साखर कारखान्यांमध्ये पाठवावा असे वृत्त प्रसारीत होत आहे. यामुळे शेतकरी चिंतीत आहे, तरी शेतकऱ्यांचा पूर्ण ऊस तोड झाल्या शिवाय साखर कारखाने बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

जिल्ह्यात प्रामुख्याने शिंदखेडा शिरपूर तालुक्यात चालू गाळप हंगामात मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड झाली आहे. पावसाळा लांबल्याने भुसभूसित असलेल्या काळ्या शेतजमिनीत वाहन जाऊ शकत नसल्याने व इतर कारणांमुळे ऊस तोड लांबली. वेळेत शेतकऱ्यांकडे स्वत: ऊस तोड करणे व वाहतुक करण्यासाठी पुरेसे साधन देखील नाहीत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना स्वखर्चाने ऊस कारखान्यांकडे ऊस तोड करुन पाठवणे शक्य नाही. अशा स्थितीत धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी साखर कारखाने बंद होण्यापुर्वी ऊस तोड करण्याची वृत्ताने शेतकरी चिंतीत झाले आहेत. आधीच उसाची लागवडीवर मोठा खर्च झालेला आहे. अशात ऊसाची तोडणी झाली नाही आणि ऊस शेतात राहिली. तर शेतकऱ्यांनी सामुहीक आत्महत्या करणार असल्याचे निवेदन दिले आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करुन शेतकऱ्यांना स्वखर्चाने ऊस कारखान्यांकडे पाठविण्यासाठी वेठीस धरणे संयुक्तिक नाही.

शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन जिल्ह्यातील गाळप पूर्ण होईपर्यंत साखर कारखाने बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस कामराज निकम, जिल्हा परिषद सदस्य विरेंद्र गिरासे, आशितोष पाटील यांनी केली आहे. या बाबत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...