आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धुळे:फडणवीसांचे स्वकीयांविरोधातच कटकारस्थान - राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांची टीका

धुळे10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'गोपीचंद पडळकर यांना आमदारकीची नशा चढली'

आमदार होऊन आठ दिवस झालेले नाही, आमदारकीचा उपभोग घेण्याआधीच गोपीचंद पडळकर यांना आमदारकीची नशा चढली आहे. पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सारख्या ज्येष्ठ राजकीय व्यक्तीवर खालच्या स्तरावर जाऊन टीका करताना वापरलेल्या भाषेवरून त्यांची राजकीय पात्रता, विचारांची शुद्रता आणि पातळी दिसून येते. शरद पवार यांची राजकीय उंची, वय, अनुभव पहाता पडळकर पवारांच्यासमोर डासा इतकेही नसल्याची टीका माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस आपल्याच पक्षातील लोकांच्या विरुध्द कटकारस्थान करायचे हे सुसंस्कृतपणाचे, दिलदार पणाचे लक्षण नाही तर संकुचित, क्षुद्र विचारांचे प्रतीक असल्याचा आरोप गोटे यांनी केला आहे.

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आमदार गोपीचंद पडळकरांनी विद्यमान सरकारवर टीका करताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी गंभीर वक्तव्य केले. या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. गोटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले की, गेल्या दहा महिन्यापासून शरद पवार यांच्या सोबत काम करतो आहे. दिलेल्या शब्दाला जागणे, मनामध्ये कधीही द्वेष भावना न ठेवणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. ज्येष्ठ नेते शरद पवारांवर कोणी टीका करत असेल तर त्यांना राग येत नाही, मात्र जर कोणी चॅलेंज देत असेल तर सर्व शक्तीनिशी ते हे चॅलेंज मोडून काढतात, असेही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीसांनी माझ्याशी केलेला विश्वासघात जगजाहीर आहे. एकही धनगर विधानसभेत घेऊ नये यासाठी केलेले कारस्थान, डावपेच आणि प्रसंगी विरोधकांना बळ देण्याचे उद्योग त्यांनी केले. मुस्लिम उमेदवार निवडून आला तरी चालेल अनिल गोटे निवडून येता कामा नये, अशी नीती आखण्यात आली होती, असा आरोप त्यांनी या वेळी बोलताना केला. दरम्यान, आता यावर फडणवीस काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...