आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरोप समारंभ:बोडकीखडी माध्यमिक विद्यालयातील‎ दहावीच्या विद्यार्थ्यांना दिला निरोप‎

साक्रीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बोडकीखडी माध्यमिक विद्यालयाच्या‎ इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ तसेच गुणवंत‎ विद्यार्थ्यांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम‎ उत्साहात झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जगदीश शिंदे‎ होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार जी. टी. मोहिते, ग्रा.पं.‎ सदस्य मनोज सूर्यवंशी, माजी सदस्य सीताराम गांगुर्डे,‎ पत्रकार संघपाल मोरे, किसन देसाई, माजी गुणवंत विद्यार्थी‎ राजेंद्र माळचे, कुमारी शर्मिला चौरे या मान्यवरांच्या शुभहस्ते‎ गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवले.

प्रास्ताविक मुख्याध्यापक‎ जगदीश शिंदे यांनी केले. शिक्षक व्ही. एम. सोनवणे, वाय.‎ ओ. बोरसे, व्ही. एस. पाटील, एस. एस. भामरे, वाय. एच.‎ बोरसे, एस. एस. वाघ, लिपिक वाय. डी. बोरसे, एन. एन.‎ भामरे यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन व्ही. एम. सोनवणे‎ यांनी केले. आभार व्ही. एस. पाटील यांनी मानले.‎

बातम्या आणखी आहेत...