आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कानबाई मातेचा उत्सव उत्साहात साजरा:दोंडाईचात कानबाई मातेला निरोप

दोंडाईचा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खान्देश कुलस्वामिनी कानबाई मातेला सोमवारी निरोप देण्यात आला. शहरातील विविध भागातून मिरवणूक काढण्यात आल्या. दोन वर्षानंतर कानबाई मातेचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. चांगला पाऊस पडू दे असे साकडे घालण्यात आले.

कानबाई मातेचे रविवारी आगमन झाले हाेते. भाविकांनी रात्रभर जागरण केले. रात्रभर पारंपारिक गीते सादर केली. त्यानंतर सोमवारी सकाळी कानबाई मातेला निरोप देण्यात आला. विसर्जन मिरवणूकीला सकाळी नऊ वाजेच्या सुमारास प्रारंभ झाला. शहरातील स्टेशन भाग, आझाद चौक, पंचवटी चौक, गाव दरवाजा, एकता चौक मार्गे अमरावती व भोगावती नदीच्या संगम स्थळापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. भाविकांनी ढोल ताशे, डिजेच्या गजरात नृत्य केले. फुगडी खेळत कानबाई मातेला निरोप दिला. नगरपालिकेतर्फे निर्माल्य जमा करण्यासह पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...