आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कानुबाई मातेचा उत्सव:शहादा येथे विसर्जन मिरवणूक काढून कानुबाई मातेस निरोप

शहादा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात सोमवारी खान्देश कुलस्वामिनी कानुबाई मातेला विविध मिरवणुकाच्या माध्यमातून सर्जन करण्यात आले. तीन वर्षापासून कोरोना महामारीमुळे सारेच सण-उत्सव बंद होते. त्यात कानुबाई मातेचा उत्सव देखील बंद होता. त्यामुळे नवस फे़डणाऱ्यांची संख्या अधिक होती. शहरात गल्लीबोळात कानुबाई मातेची स्थापना करण्यात आली होती. रात्रभर धार्मिक कार्यक्रम सुरू होते. वर्दळ ही मोठ्या प्रमाणात होती. रोटसाठी बाहेर गावाहून प्रत्येकाचे परिवारातील सदस्य आलेले होते.

सोमवारी सकाळी दहा वाजेपासून वाजत गाजत मिरवणुका सुरू झाल्या. महिलांची संख्या कमालीची होती. पाण्याचे फवारे मारले जात होते. असंख्य महिला आनंदाने फुगड्या खेळत होत्या. कानुबाई मातेचे दर्शन घेण्यासाठी अनेकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. प्रेस मारुती परिसर दोंडाईचा रस्ता गांधीनगर परिसरात विसर्जन मिरवणुका अधिक होत्या. शहादा शहराला लागून जाणाऱ्या गोमाई नदीला पाणी असल्याने आणि भावसार मढी जवळ विसर्जन केले. ग्रामीण भागातील नागरिकांनी प्रकाशा येथे तापी नदीत कानुबाई मातेचे विसर्जन केले.

बातम्या आणखी आहेत...