आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी:जैताणे शिवारात शेतकऱ्याला मारहाण, पाच जणांवर गुन्हा

धुळे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साक्री तालुक्यातील जैताणे गावाच्या शिवारात सामाईक शेत बांधावरील गवत कापण्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला. यातून शेतकरी व त्याच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली. तरुण शेतकरी मयूर श्रावण पगारे ( वय २८) यांनी तक्रार दिली आहे.

त्यांच्या तक्रारीनुसार रवींद्र बारीक पगारे, पंकज बारीक पगारे, प्रवीण गोटू पगारे, धनराज गोटू पगारे, कल्पेश धनराज पगारे (सर्व रा. जैताणे) यांनी मारहाण केली. अशी तक्रार दिली आहे. निजामपूर पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...