आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही:वीजपुरवठा खंडित केल्याने शेतकऱ्याची आत्महत्या‎

धुळे‎19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मेहेरगाव येथील शेतकरी‎ ‎ भटू भामरे यांच्या‎ ‎ आत्महत्येची घटना‎ ‎ ताजी असताना‎ ‎ सोमवारी न्याहळोद‎ ‎ गावातील तरुण‎ ‎ शेतकऱ्याने‎ आत्महत्या केली. भरत पाटील असे मृत‎ शेतकऱ्याचे नाव आहे. वीज कपंनीने‎ खंडित केलेला वीज पुरवठा विनंती‎ करूनही सुरू न केल्यामुळे भरत पाटील‎ यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, अशी‎ माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.‎ शहरापासून जवळ असलेल्या‎ न्याळोद येथील शेतकरी भरत रमेश‎ पाटील (वय २६) यांची गाव शिवारात‎ सुमारे ३ एकर शेती आहे. त्यांनी कांदा व‎ मका लावला होता. यंदा अपेक्षेप्रमाणे‎ उत्पन्न मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होती.‎ पण १० दिवसांपूर्वी वीज कंपनीने वीज‎ पुरवठा खंडित केला. त्यामुळे पिकांना‎ पाणी देण्याचा प्रश्न भरत पाटील‎ यांच्यासमोर होता. त्यांनी वीज कंपनीच्या‎ कार्यालयात जात वीजपुरवठा सुरू‎ करण्याची विनंती केली होती. पण‎ अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही.‎ त्यामुळे भरत पाटील यांनी शेतात विषारी‎ द्रव औषध सेवन केले. हा प्रकार लक्षात‎ आल्यानंतर त्यांना हिरे रुग्णालयात‎ दाखल करण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...