आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोसायटीची निवडणूक:जोगशेलू सोसायटीत शेतकरी विकास सत्तेत

शिंदखेडा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील जोगशेलू येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक नुकतीच झाली. निवडणुकीत शेतकरी विकास परिवर्तन पॅनलने वर्चस्व मिळवले. सोसायटीच्या चेअरमनपदी शांताराम बाजीराव देसले व व्हाइस चेअरमनपदी बाबूराव उत्तम भील यांची बिनविरोध निवड झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी गिरीश महाले, सचिव पदमोर यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया झाली. चेअरमन व व्हाइस चेअरमनपदासाठी अनुक्रमे देसले व भील यांचा एकमेव अर्ज आला होता. या वेळी नवनिर्वाचित सदस्य आसाराम वामन मोरे, भिकन बाबूराव देसले, लोटन सोनू सोनवणे, अजबसिंग गिरासे, रंजनाबाई देसले व निखिल हंसराज देसले यांचा सत्कार झाला. निवडणूक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष निखिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाली. या वेळी पॅनलचे मार्गदर्शक विश्वास देसले, प्रकाश देसले, अशोक देसले, दिलीप चौधरी, गबा सोनवणे आदी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...