आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:शेतकरी आत्महत्या; मदतीचे 6 प्रस्ताव मंजूर

धुळे10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकरी आत्महत्या निर्मूलन व सहाय्यता समितीची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. बैठकीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचे सहा प्रस्ताव पात्र ठरले. तसेच दोन प्रस्तावांची फेरचौकशी करण्याचा निर्णय झाला.जिल्हाधिकारी जलज शर्मा अध्यक्षस्थानी होते. या वेळी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, साक्री पंचायत समितीचे सभापती शांताराम कुंवर, सदस्य कुशावर्त पाटील, उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मनोजकुमार दास, तहसीलदार गायत्री सैंदाणे सुनील सैंदाण, अप्पर तहसीलदार आशा गांगुर्डे, संजय शिंदे आदी उपस्थित होते.

तहसीलदारांनी चौकशी करून मदतीचे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केले होते. ज्या गावात आचारसंहिता लागू आहे त्या गावातील प्रस्ताव वगळून उर्वरित एकूण १७ प्रस्ताव चर्चेसाठी होते. त्यापैकी सहा प्रस्ताव मंजूर झाले. तसेच ९ अपात्र ठरले. मंजूर प्रस्तावात धुळे ग्रामीण, शिंदखेडा आणि दोंडाईचा अप्पर तहसील क्षेत्रातील प्रत्येकी दोन प्रस्ताव आहे.

बातम्या आणखी आहेत...