आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी संतप्त:वीज कार्यालयाला शेतकऱ्यांच्या घेराव‎

शहादा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मामाचे मोहिदासह परिसरातील ‎गावांमधील शेतातला विद्युत पुरवठा ट्रांसफार्मर निकामी झाल्याने गेल्या‎ वीस दिवसापासून विद्युत पुरवठा ‎खंडित असून शेतकरी सातत्याने ‎ शहादा येथील विद्युत वितरण‎ कंपनीच्या कार्यालयात फेऱ्या मारत ‎होते. परिणामी शेतकऱ्यांची पिके जळायला लागली होती.‎ शेतकऱ्यांच्या संयम सुटल्याने त्यांनी ‎शहादा येथील विद्युत वितरण ‎विभागाच्या कार्यालयाला घेराव‎ घालून अधिकाऱ्यांना अक्षरशः‎ धारेवर धरले होते. शेतकरी‎ अधिकाऱ्यांवर संतप्त झाले होते.‎ सुमारे दोन तास वाद झाला.

शेवटी‎ विद्युत वितरण विभागाच्या‎ कार्यकारी अभियंत्यांनी मंगळवार‎ दिनांक ८ नोव्हेंबरपर्यंत विद्युत पराठा‎ सुरळीत केला, जाईल असे‎ आश्वासन दिल्यानंतर वाद मिटला.‎ शहादा तालुक्यातील मामाचे‎ मोहिदा, साेनवद, कवठळ,‎ सावळदा, शिरुड या गावातील‎ शेतात मधील विद्युत पुरवठा वीस‎ दिवसापासून बंद आहे. ट्रान्सफर‎ नादुरुस्त असून कमी क्षमतेच्या‎ आहे. १३२ केव्हीवरील रोहित्र बंद‎ आहे. शेतकऱ्यांनी सातत्याने‎ अधिकाऱ्यांना तक्रारी केल्या. विद्युत‎ ट्रांसफार्मर बदलून मिळावा व‎ ‎ ‎ ‎ अधिक क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मर‎ लावावा अशा मागण्या केल्या.

पण‎ अधिकाऱ्यांनी गांभीर्य लक्षात घेतला‎ नाही पूर्णतः दुर्लक्ष केले. संयम‎ सुटल्याने परिसरातील दीडशे ते‎ दोनशे शेतकऱ्यांनी शहादा येथील‎ विद्युत वितरण कंपनीला घेराव‎ घालून कार्यकारी अभियंता अमित‎ शिवलकर सहाय्यक कार्यकारी‎ अभियंता भूषण जगताप यांना‎ धारेवर धरले. या वेळी जिल्हा‎ परिषद कृषी सभापती हेमलता‎ शितोळे, सरपंच पुरुषोत्तम पाटील,‎ भाऊभाई पाटील, रमाकांत पाटील,‎ राजाराम पाटील, दीपक पाटील,‎ प्रकाश पाटील, अरविंद पाटीलसह‎ शेतकरी या वेळी मोठ्या संख्येने‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...