आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साक्ष:पिता-पुत्र खून साक्ष; पंचांनी ओळखली तलवार

धुळे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवपुरातील गोंदूररोड परिसरात वैभव व रावसाहेब पाटील या पिता-पुत्राचा खून झाला होता. या हत्याकांडात वापरलेली कुकरी, तलवार व संशयित आरोपींना सोमवारी शासकीय पंचने न्यायालयात ओळखले. या प्रकरणी उद्या मंगळवारी पुन्हा कामकाज होणार आहे.

या खटल्याचे कामकाज न्यायालयात न्या. सय्यद यांच्या समक्ष सुरू आहे. त्यानुसार सोमवारी सकाळी कामकाजाला सुरुवात झाली. शासकीय पंच उदय सुभाष चौधरी यांची साक्ष झाली. खून केल्यानंतर संशयितांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने फेकलेले व लपवलेले हत्यार न्यायालयात आणले होते. साक्षीदार उदय चौधरी यांनी ते ओळखले. त्यात कुकरी व तलवार होती. तसेच एका प्रश्नाला उत्तर देताना संशयित आरोपी न्यायालयात हजर असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार पक्षातर्फे अॅड. देवेंद्र तंवर काम पाहत आहे.

बातम्या आणखी आहेत...