आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एफडी’:‘त्या’ सावकाराच्या लॉकरमध्ये 2400 नागरिकांच्या नावे आढळल्या ‘एफडी’

धुळे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवैध सावकारीतून कोट्यवधीची माया जमवणाऱ्या राजेंद्र बंब याच्या पतसंस्थेतील लॉकरमध्ये तब्बल २ हजार ४०० नागरिकांच्या नावे असलेल्या एफडी अर्थात मुदत ठेव पावत्या सापडल्या. कर्ज घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी दिलेल्या कागदपत्रांचा दुरुपयोग करून राजेंद्र बंब या नागरिकांच्या नावे परस्पर एफडी करत होता. नागरिकांच्या परोक्ष एफडीची रक्कम काढून गंडा घातला जात होता, असा अंदाज आहे. त्यामुळे पोलिस संबंधित पतसंस्थेच्या संचालकांकडेही चौकशी करणार आहे. गेल्या आठवड्यापासून अवैध सावकारीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या राजेंद्र बंब याचा आणखीन एक पराक्रम उघडकीस आला आहे. तपास यंत्रणेने शहरातील योगेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेत असलेल्या राजेंद्र बंब याच्या लॉकरमधून राेकड, दागिने, विदेशी चलन जप्त केले. तसेच सुमारे २ हजार ४०० नागरिकांच्या नावावर असलेल्या एफडी अर्थात मुदत ठेवीच्या पावत्याही आढळून आल्या. किमान ९ ते जास्तीत जास्त १५ हजार रुपयांच्या एफडीचा त्यात समावेश आहे. त्यापैकी काही नागरिकांच्या नावावर परस्पर राजेंद्र बंब याने एकापेक्षा अधिक एफडी केल्या आहे. त्यापैकी एका नागरिकाच्या नावाने तब्बल २१ एफडी आढळल्या आहे. वर्षभरासाठी या एफडी केल्या जात होत्या. वर्षभरानंतर राजेंद्र बंब स्वत: एफडीचे नूतनीकरण करून गंडा घालत होता.

हा तर ठोस पुरावा : या प्रकरणातील मूळ तक्रारदार जयेश दुसाने यांनी तक्रारीत उल्लेख केल्याप्रमाणे त्यांच्या वडिलांच्या नावे असलेली मालमत्तेची कागदपत्रे सापडली आहे. याशिवाय अन्य एक तक्रारदार विलास ताकटे यांच्या दुकानाची कागदपत्रे ही याच लॉकरमधून मिळाली आहे. त्यामुळे गुन्ह्यांच्या तपासात ही कागदपत्रे महत्त्वाची ठरतील, असा पोलिसांचा विश्वास आहे.

तज्ज्ञांचा घेणार सल्ला नागरिकांनी दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे परस्पर एफडी करण्याचा प्रकार गंभीर आहे. या संदर्भात वेगळा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. त्यासाठी पोलिस प्रशासन एफडी संदर्भात तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...