आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासणवारांच्या तोंडावर शहरात आणि जिल्ह्यात मिठाईसह खाद्यपदार्थ आणि फराळ, उपवासाच्या पदार्थ यांच्यात अनेकदा भेसळीसह निकृष्ट पदार्थ वापरण्याची शक्यता असते. त्यामुळे विषबाधेसह अन्य विकार होण्याची भीती असते. त्यामुळे अन्न प्रशासनाने खबरदारी म्हणून या महिन्यात १३ ठिकाणचे अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. त्यात विविध पदार्थाचा समावेश आहे.
सोमवारपासून घटस्थापना झाली आहे. या पुढे महिनाभर सणावारांची धामधूम सुरू आहे. आता नऊ दिवसांच्या उपवास व्रत काळात भगर आणि साबुदाणा यांना अधिक मागणी असते. त्याच बरोबर नवरात्र, दसरा आणि दिवाळी या काळात मिठाई, पेढे, गुलाब जामुन, खवा यांना अधिक मागणी असते. मागणी वाढल्यामुळे विक्रेते निकृष्ट, शिळे अन्नपदार्थ त्याच आणि भेसळयुक्त पदार्थ विक्री करण्याचे प्रकार वाढत असतात. त्यावर नियंत्रण ठेऊन नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी अन्न प्रशासनाकडून कारवाई होते.त्याच अनुषंगाने अन्न आणि औषध प्रशासनाने शहरासह जिल्ह्यातील विविध भागात आणि दुकानांतून १३ नमुने घेऊन तपासणीस पाठवलेत.
उपवास साहित्यासोबत मिठाई घेताना काळजी घ्या
नऊ दिवसांच्या उपवासात भगर आणि साबुदाण्याला विशेष मागणी असते. या शिवाय या कालावधीत मिठाई, लाडू,पेढे यांना मोठी मागणी असते नागरिकांनी चांगल्या दर्जाची पदार्थ खरेदी करावी. अधिकृत विक्रेते तथा ब्रँडचे खरेदी करावे. साहित्य अधिक दिवस ठेवले तर बुरशी लवकर लागत असल्याने काळजी घ्यावी, अन्न पदार्थ खरेदी करतांना पॅकिंग तपासून पहावी, शिवाय साहित्य खरेदी केल्यानंतर बिल घ्यावे, स्वच्छता बाबतच्या मानकांची देखील पडताळणी करावी, आदी सूचना करण्यात आल्या आहे.
सणाच्या पार्श्वभूमीवर घेतले नमुने
शहरासह जिल्ह्यातील विविध दुकानांतून अनेक पदार्थांचे नमुने घेतले आहेत. चालू महिन्यात १३ नमुने घेतले आहेत. तर एप्रिलपासून आतापर्यंत ४१ नमुने घेतले आहेत. नागरिकांमध्ये प्रबोधन देखील केले जात आहे. आता सण उत्सव सुरू असल्याने ही मोहीम सुरू राहणार आहे.
-संतोष कांबळे, सहायक आयुक्त अन्न, धुळे,
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.