आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्या:उमरी शिवारात रानमांजराच्या पिलांना बिबट्या समजून शेतकऱ्यांमध्ये भीती ; अधिकारी व कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून

बोरदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तळोदा तालुक्यातील उमरी शिवारातील एका शेतात सोमवारी सायंकाळी ऊसतोड मजुरांना रानमांजराची पिले आढळून आली आहेत. तळोदा वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मादी रानमांजर पिलांना घेऊन जाईल, असा कयास वनविभागाला असून त्यासाठी पिलांना त्याच शेतात ठेवण्यात आले आहे. मोहिदा ता. तळोदा येथील शेतकरी उद्धव पाटील यांच्या मोहिदा गावालगत असलेल्या उमरी शिवारातील शेतामध्ये सध्या उसाची तोडणी सुरू आहे. सोमवारी दुपारी चार वाजेचा सुमारास ऊसतोड मजुरांना रानमांजराची तीन पिले आढळून आली. याबाबत तातडीने तळोदा वनविभागाला कळवले. दरम्यान तळोद्याचे वनक्षेत्रपाल नीलेश रोडे हे आपल्या पथकासह लागलीच घटनास्थळी दाखल झालेत व घटनास्थळी पाहणी करीत त्या पिलांना ताब्यात घेतले. ही पिले चार ते पाच दिवसांपूर्वी जन्माला आली असावीत, असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. तसेच हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाने शेतात ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. तर मंगळवारी सायंकाळपर्यंत ती पिल्ले शेतात असून अद्याप मादीने नेले नसल्याची माहिती वनविभागाने दिली.

बातम्या आणखी आहेत...